

कोल्हापूर : रुक्मिणीनगरातील मानसी इस्टेटच्या टेरेसवरून उतरत चोरट्यांनी नऊ लाख ८० हजारांची रोकड पळवून नेली. हा प्रकार २९ मार्चला दुपारी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान प्रकार घडला होता. याबाबत राजू राम केसरी (वय ४२, रा. कारंडे मळा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका परप्रांतीय संशयिताचे नाव पोलिसांनी निष्पन्न केले असून, त्याच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले.