
कोल्हापूर : सहा वर्षांपासून चालक म्हणून नोकरी... मालकांचा विश्वास जिंकून घरात वावर... शेअर मार्केटमध्ये मोठा तोटा झाल्याने आर्थिक विवंचना... कर्जबाजारीपणामुळे चोरीचा विचार त्याच्या डोक्यात आला....सर्व्हिसिंग सेंटरमधील मित्राच्या मदतीने थेट मालकांच्याच घरी चोरीचा घाट घातला. सम्राटनगरात उद्योजकाच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा होताना मालक आणि कामगारातील विश्वासाला मात्र तडा गेला.