100 year old man human interest story by niwas mote
100 year old man human interest story by niwas mote

बापू एकदम फिट : वयाची शंभरी जवळ आली तरी आवड्या बापू करतात शेतात काम 

Published on

जोतिबा डोंगर  (कोल्हापूर) : यंदा कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक वयोवृध्दांना या आजाराचा सामना करावा लागला . कित्येकांना कमी रोगप्रकार शक्तीमुळे प्राण ही गमवावे लागले . पण  या वयोवृध्द आवड्या बापूंचे वय आहे शंभराच्या आसपास  . त्यांना बी.पी नाही. शुगर नाही. ते एकदम तंदुरुस्त आहेत. दररोज ते गावापासून शेतात पायी चालत जातात. डोक्याला टोपी अंगरखा ,हातात काठी कमरेला गुंडाळला रुमाल लंगोटा हा त्यांचा पेहराव. सकाळी नऊ वाजता ते शेतात जातात . आपल्या शेतात भांगलन करून दुपारी उन्हात तडाख्यात सावलीत बसून सायंकाळ झाली की पुन्हा घरची वाट धरतात. या वयात ही बापू एकदम फिट आहेत.


 आपल्या नातवंडांना मायेचा धाक दाखवायचा , थोडा शीण आला की देवाचं नाव घेत घराचा कोपरा धरून बसायचं हे या बापूंच वय. पण वयाची शंभरी जवळ आली तरी आवड्या बापूंना शेतीची कामे करण्याची हौस अजून पूर्ण झालेली नाही. उतार वयात आवड्या बापूंच खुरपं आपल्या शेतात सरारा चालत आहे.पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ आळते येथील शामराव भगवंता साळोखे तथा आवड्या बापू हे जुन वयोवृध्द व्यक्तीमत्व .  त्यांचा जन्म पोहाळेत  झाला. बापू ना शिक्षण घेता आलं नाही. कारण घरची परिस्थिती . पूर्वीच्या काळी  मनोरंजनाची साधने नव्हती त्याकाळी पारंपारीक खळी , पार , तालमी या ठिकाणी नाटक रामायण महाभारत भजने व्हायची. तीच त्यांची मनोरंजनाची साधने.एका नाटकात आवड्या हे पात्र होते त्या पात्रा नुसार शामराव साळोखे यांना आवड्या बापू हे टोपण नाव पडलं आणि गाव व परिसरात बापू आवडया बापू नावाने  परिचित झाला.

पूर्वी ग्रामीण भागातील जन जीवन हे पावसावर अवलंबून असे.
 येथील जमिनी या सर्रास खडकाळ व मुरमाच्या त्यामध्ये  भात भुईमुग ज्वारी शाळू हीच पिके या ठिकाणी होत. यावरच सर्व गावचा कुटुंबाचा गाडा चालायचा. बापुना कोवळ्या वयात शेतीची कामे करताना खूप त्रास व्हायचा. नांगरट करणे बैलगाडी चालवणे, शेतात काम करणे ही कामे त्रासदायक होती  पण बापुनी ती मन लावून केलीत. ही कामे करताना अंगातील घाम  व्हायचा पण त्यांना कुंटूबांसाठी सर्व सहन करावे लागत .
 पावसाळ्याच्या दिवसात तर चिखल तोडताना फार त्रास व्हायचा. राम पाठवायचा पण हालअपेष्टा सहन करून बापू मी आपला संसार जोमाने थाटला.


पूर्वी सारा कारभार चार आणे आठ आणे  यावर चाले जिद्दीने बापूंनी भाऊ बहिणी मुले मुली यांची लग्ने लावून दिलीत.  
सध्या बापूनी या वयात ही आपला दिनक्रम सोडलेला नाही. दररोज ते पहाटे पाच ला उठतात .हिंडतात फिरतात ,अंगण व जनावरांचा गोठा झाडून काढणे  ही कामे करतात. बापू दररोज भाजी भाकरी भात लोणचं दूध  शेंगदाणे आवडीने खातात बापूंचे निम्मे दात अजूनही शाबूत आहेत. दृष्टीही चांगली आहे. त्यांना ऐकू ही चांगले येते . चालण फिरणे खाण याला त्यांनी महत्व दिले आहे.  तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. घरोघरी वाहिन्यांच्या छायेत कुटुंबाकुटुंबात भांडणे सुरू आहेत.

मोबाईल मुळे तर तरुण पिढीची बरबादी झाल्याची खंत बापू करतात.  शंभरी जवळ आलेल्या बापूनी शेतात राहणं पसंत केलेय . शेतातील स्वच्छ खेळती हवा बापूंच्या अंगात भिनली आहे. काही झालं तरी डगमगायचं नाही, आपला दिनक्रम बदलायचा नाही, एवढे पथ्य बापूंनी आयुष्यभर पाळले त्यामुळे बापूनी हे वय पार केले .जीवनातील ताणतणावांना ते पूरून उरलेत. माझी शेती येथील निसर्गच गडया माझा मित्र असल्याचं बापुना वाटते

माझ सर्व आयुष्य शेतीतच गेलं . वय झाल तरी मी शेतात जाणं सोडलं नाही. शेतीत जाण्यामुळे माझा दररोज व्यायाम होतो. अरोग्य चांगले राहते. तरुण पिढी मोबाईल टीव्हीमुळे बिघडत चालली आहे .काय नको ते ऐकायला बघायला मिळते. पूर्वीचा जमाना बरा वाटतो.

 शामराव भगवंता साळोखे  (आळते तर्फ आळते  ता. पन्हाळा )

संपादन - अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com