
-शिवाजी पाटील
आवळी बुद्रुक : ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’ नावाचा अपघात रोखणारा अनोखा डेमो तयार करून दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रेम नवनाथ पसारे (वय १५) असे या युवा संशोधक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील असून, सध्या तो सांगली येथे वास्तव्यास आहे.