दहावीच्या निकालातही कोल्हापूरकरांचा झेंडा...

10th result of Kolhapur division is 97.64 percent
10th result of Kolhapur division is 97.64 percent
Updated on

कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी परीक्षा निकाल आज जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा निकाल 97. 64 टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत निकालात 11.6 टक्के वाढ आहे. कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९८.२१ टक्के आहे. सांगली जिल्ह्याचा निकाल ९७.२२ टक्के तर सातारा जिल्ह्याचा निकाल ९७.२५ टक्के लागला आहे.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल. तसेच www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. याशिवाय ३० जुलैपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत तसेच स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय शिक्षण मंडळाकडे ऑनलाइन येणार आहे. http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

गुणपडताळणीसाठी ८ ऑगस्टपर्यंत, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींसाठी १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी छायांकित प्रत घेणे आवश्‍यक असून, ती मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत अर्ज करणे आवश्‍यक आहे, असेही राज्य शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com