
Blood Donation Camp : वर्षभरात जिल्ह्यातील सुमारे १२ हजार नागरिक स्वेच्छेने सीपीआरच्या रक्तपेढीत रक्तदान करून सामाजिक भान जपत आहेत. रक्तदानामुळे धोक्यात असलेल्या एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, आपली एक कृती किती सकारात्मक परिणाम करते, याची जाणीव झाल्यानेच कोल्हापूरकर रक्तदानाबाबतच समाजातील इतर लोकांनीही रक्तदान करावे, यासाठी शिबिरांचे आयोजन करत आहेत.