उत्तूर : परिस्थितीमुळे शिक्षण अपुरे राहिले. शिक्षणात आपण थोडे मागे पडत आहोत याची जाणीव झालेल्या संतोष कांबळे या आजरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याने चक्क लेकीसोबतच जिद्दीने बारावीची परीक्षा देऊन या परीक्षेत यश संपादन केले. एकाच वेळी बाप-लेक बारावी परीक्षा (12th Exam Results) उत्तीर्ण झाल्याने कांबळे कुटुंबीयात आनंदी आनंद आहे.