

13 year old Dubai boy dies in Kagal MIDC accident
esakal
Kagal MIDC tragic accident : दुबईहून सुट्टीसाठी आजोळी जात असताना काळाने १३ वर्षीय चिमुरड्यावर घाला घातला. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मेटाकास्ट कंपनीच्या चौकात दुचाकी आणि आयशरच्या भीषण अपघातात अथर्व प्रकाश कानडे (वय १३, रा. बेळगुंदे, ता. गडहिंग्लज) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्याचे मामा आणि बहीण किरकोळ जखमी झाले आहेत.