Kolhapur News : वीज सवलतीचा १५४३ शेतकऱ्यांना फटका; शाहूवाडी तालुक्यातील चित्र, तिमाहीत दीड कोटीवर वसुली
विद्युत जोडणी विद्युत भार ७.५१ पेक्षा जास्त नोंदवल्यामुळे त्यांना सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यात ३४० ग्राहक आहेत. शेती पंपाच्या क्षमतेवर ग्राहकांचे वर्गीकरण करून शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा निर्णय झाला, तर याचा शेताकऱ्यांना लाभ होईल.
Over 1,500 farmers in Shahuwadi hit by subsidy removal; power dues recovery crosses ₹1.5 crore.Sakal
बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील १५४३ शेतकरी वीज बिल सवलतीपासून वंचित आहेत. जाचक अटीच्या शासन निर्णयचा फटका बसला असून, यातून तिमाही वीज बिलापोटी शेतकऱ्यांची १ कोटी ५६ लाख ३५ हजार नऊशे पस्तीस रुपयांची वसुली केली जात आहे.