गावी जाणाऱ्यची ओढ अधुरी राहिली, चालत मध्य प्रदेशला निघालेल्या 17 जणांना सिंधुदुर्गमध्ये पाठवले

गावी जाणाऱ्यची ओढ अधुरी राहिली,  चालत मध्य प्रदेशला निघालेल्या 17 जणांना सिंधुदुर्गमध्ये पाठवले
Updated on

कोल्हापूर : दिवसा पोलिस पकडतील म्हणून सलग दोन रात्री चालत सिंधुदुर्गातून कोल्हापुरात आलेल्या 17 जणांना आज पोलिसांनी ताब्यात घेऊन परत सिंधुदुर्गला पाठवले. हे सतरा जण मध्य प्रदेशातले असून, ते सिंधुदुर्गात चिऱ्याच्या खाणीवर कामावर होते. लॉकडाउनमुळे रोजगारासह जगण्याचे वांदे झाल्याने या सतरा जणांनी चालत का होईना, पण मध्य प्रदेशला आपापल्या घरी जायचे म्हणून ते बाहेर पडले होते. अर्थात त्यामागे घराकडे जायची ओढ होती. पण, पोलिसांनी पकडल्यामुळे त्यांची ओढ अधुरी राहिली. 

हे सतरा जण गेले दोन दिवस मुख्य रस्ता सोडून अन्य मार्गाने रात्री चालत चालत कोल्हापूरकडे निघाले होते. दिवसभर ते नदीकाठ, ओढ्याचा काठ किंवा एखाद्या गावालगत मोकळ्या माळावर झाडाखाली थांबत होते. मार्गावरच्या कोणत्याही गावातील लोक त्यांना आपल्या गावात येण्यास मज्जाव करत होते. आज सकाळी ते कोल्हापुरात आले आणि उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ पोलिसांच्या नजरेस आले. दोन दिवसांचे सलग चालणे, पाठीवर पिशव्या, अंग घामाने डबडबलेले अशा या सतरा जणांना पोलिसांनी थांबवले. उड्डाणपुलाखाली सावलीत बसवले. सावलीत बसताच अनेक जण गाढ झोपी गेले. कारण दोन दिवसांच्या पायपिटीने ते दमून गेले होते. पोलिसांनी त्यांना पाणी व खाद्यपदार्थ दिले. तुम्ही मध्य प्रदेशात चालत जाऊ शकणार नाही, असे समजावून सांगून त्यांना परत सिंधुदुर्गकडे पाठवले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com