‘किसान’ योजनेत १९१ बोगस लाभार्थी

191 fraud beneficiaries in Kisan scheme
191 fraud beneficiaries in Kisan scheme
Updated on

निपाणी (बेळगाव) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत निपाणी विभागातील १९१ कर भरणाऱ्यांच्या खात्यावर योजनेंतर्गत निधी जमा झाला आहे. कर भरणारे लोक योजनेसाठी पात्र नसल्याने योजनेंतर्गत अशा लोकांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश सरकारने कृषी खात्याच्या येथील रयत संपर्क केंद्राला दिले आहेत. तशी नोटीस रयत केंद्राने लाभार्थ्यांना बजावल्याने अशा लोकांना दणका बसला आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत वर्षाला ६ हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची व्यवस्था आहे. मात्र योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी काही निकष असून कर भरणारे लोक योजनेसाठी पात्र ठरू शकत नसल्याचे मुख्य निकष आहेत. तरीही काही शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज केले होते. 
प्राथमिक टप्प्यात असे लाभार्थी पात्र ठरल्याने त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने निधी जमा झाला आहे. काही जणांच्या खात्यावर २ तर काही जणांच्या खात्यावर ३, ४ व ५ हप्ते झाले आहेत. मात्र खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर अर्जधारकांची छाननी झाल्यावर काही लाभधारक हे कर भरणारे असल्याचे 
आढळून आले.


कारण त्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये आधारकार्ड आहे. आधारकार्ड हे पॅनकार्डशी लिंक असल्याने कर भरणारे लोक उघडकीस आले आहेत. खात्याने तातडीने रयत केंद्राच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अशा लाभार्थ्यांना नोटीस बजावून जमा झालली रक्कम वसूल करण्यास सांगितले आहे. अपात्र लाभार्थ्यांनी जमा झालेली रक्कम धनादेश किंवा डीडी स्वरुपात रयत केंद्रात जमा करावयाची आहे. 

अर्जाची निरंतर प्रक्रिया
योजनापासून अद्याप जे शेतकरी वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांनी अर्जासह आवश्‍यक कागदपत्रे ग्राम पंचायत किंवा रयत केंद्रात जमा करण्याचे आवाहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

कर भरणाऱ्या लोकांना योजना लागू होत नाही. तरीही अर्ज केल्याने ज्यांच्या खात्यावर निधी जमा झाला आहे. आधारकार्ड पॅनकार्डला लिंक असल्याने चौकशीवेळी कर भरणारे लाभार्थी उघडकीस आले आहेत. जवळपास १९१ अशा लाभार्थ्यांना जमा झालेली रक्कम परत करण्याची सूचना नोटिसीतून केली आहे.
- पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, निपाणी रयत केंद्र

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com