
सुनील पाटील
कोल्हापूर : जिल्ह्यातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी बचत गटांचा मोठा आधार मिळाला आहे. जिल्हा ग्रामीण विकास, नागरी, जिल्हा बँकेकडील, महिला आर्थिक विकास महामंडळ, शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून एकूण १ लाखाहून २७ हजार बचत कार्यरत आहेत. विविध बँकांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याचे काम केले जात आहे. यामध्ये, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी) अग्रेसर आहे. बँकेने मार्च २०२३ अखेर ५१ हजार ३६१ गट स्थापन केले आहेत. यापैकी ३५ हजार ५८ बचत गटांना १३५ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटप करून पाठबळ दिले आहे, तर जिल्ह्यात सुमारे २०० कोटी रुपयांपर्यंत कर्जाचे वाटप होत असल्याचे चित्र आहे.