कोल्हापुरातील सोहमचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
esakal
मुख्य ठळक मुद्दे (Highlights Summary)
कडगावात दुहेरी शोककळा: एकाच गावातील दोन युवकांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाल्याने कडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
२४ वर्षीय सोहमचा हृदयविकाराने मृत्यू: मित्रांसह फिरायला गेलेल्या सोहम पाटीलचा वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
झाडावरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू: गिजवणे येथे आंब्याच्या झाडावरून पडल्याने युवराज पाटील या ४२ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
Sudden Heart Attack : कडगाव येथीलच दुसऱ्या एका युवकाला हृदयविकाराने गाठले. त्यात त्याचा मृत्यू झाला. सोहम संजय पाटील (वय २४) असे त्याचे नाव आहे. शिक्षणानंतर तो वडील संजय पाटील यांच्या सोलर व्यवसायात मदत करत असे. तसेच वडिलांनी त्याला गडहिंग्लजमध्ये सोलरचे दुकानही काढून दिले होते.