
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाने गेल्या वर्षभरात प्रभावी कामगिरीची नोंद करीत एकूण ७४ विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविले. त्या माध्यमातून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील तीन हजार २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. त्यासह ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित उद्योग, व्यवसायांमध्ये रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली.