Kolhapur River Clean up : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी ३९५ कोटी रुपये खर्चाची कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी आज पत्रकाद्वारे दिली आहे. इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लि. कंपनीकडे याचे आदेश सोपविण्यात आले..पत्रकात म्हटले आहे की, प्रकल्पांतर्गत इचलकरंजी, हातकणंगले व यड्राव औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे ‘झेडएलडी’सह उन्नतीकरण, क्षमता वाढविणे, तसेच सुमारे ८१ किलोमीटरची सांडपाणी वाहिनी व पुनर्वापर पाईपलाईन आदी कामे होणार आहेत..यासंदर्भात माने यांनी नोव्हेंबर २०२२ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत इचलकरंजी, हातकणंगले व यड्राव औद्योगिक वसाहतीमधून पंचगंगेत मिसळणारे रसायनयुक्त पाणी रोखण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्यास तत्त्वतः मंजुरी मिळाली होती. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सादर केलेल्या आराखड्याला ६०९.५८ कोटींचा निधी सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर झाला. यामध्ये जीएसटी, भाववाढ व पीएमसी खर्च वगळून रुपये ३९५ कोटींची निविदा मंजूर करून कामे इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीकडे सोपवण्यात आली..Kolhapur News:'अंबाबाईच्या दर्शनाला भाविकांची उच्चांकी गर्दी'; रविवारी एक लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन, शहरातही मोठी गर्दी.या निधीत वस्त्रोद्योग विभाग २५ टक्के, उद्योग विभाग ५० तर पर्यावरण विभागाचा २५ टक्के आहे. या कंपनीने याआधी उत्तर प्रदेशातील रामगंगा नदी, काशी, मथुरा यांसारखे ‘नमामी गंगे’ अंतर्गत प्रकल्प तसेच राजस्थानमधील एसटीपी अपग्रेडेशनची कामे पूर्ण केली आहेत. यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ईराप्पा नाईक, उपअभियंता अमित भुरले, इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक पियुष राघव, सह व्यवस्थापक आभिषेक सिंग उपस्थित होते..ही कामे दोन वर्षांत पूर्ण केली जाणार आहेत. ‘झेडएलडी’ प्रकल्प असल्याने तिन्ही औद्योगिक वसाहतीमधील एक थेंबही पंचगंगा नदीत मिसळणार नाही. हा प्रकल्प पंचगंगेला नवजीवन देईल. या कामांद्वारे औद्योगिक वाढ आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधण्यात येणार आहे.- धैर्यशील माने, खासदार.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.