कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणांहून तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. अशा नागरिकांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाइनसाठी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, लॉज, रिसॉर्ट अधिग्रहण केले आहेत.
या ठिकाणी सहनियंत्रकाचे कामकाज पाहण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे पाचशे प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. आदेश देऊनही यातील ७६ शिक्षक कामाच्या ठिकाणी हजर झाले नव्हते. याबाबत तहसीलदार गुरु बिराजदार यांनी संबंधीत शिक्षकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी उदय सरनाईक यांना दिले होते.
हेही वाचा- विद्यार्थ्यांसाठी सरकार आणणार नवी योजना? आगामी शैक्षणिक वर्षात हे होऊ शकतात मोठे बदल
दरम्यान आज शुक्रवारी २५ शिक्षक हजर झाले. त्यामुळे ५१ शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी श्री. सरनाईक यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तसेच चोवीस तासांत खुलासा करण्याचेही आदेश दिले आहेत. नोटीसा बजावलेले शिक्षक हे परजिल्ह्यातील आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.