
संदीप खांडेकर
कोल्हापूर : सहा वर्षांत जिल्ह्यातील ५ हजार १६६ वाहने स्क्रॅप केल्याची माहिती पुढे आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याबाबतचा अहवाल दिल्यानंतर त्याची कार्यवाही केली आहे. दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी पंधरा वर्षांची मुदत असून, त्यानंतर वाहनधारकांनी त्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करून घेणे जरुरीचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे.