राजेंद्र पाटील
फुलेवाडी : शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या संचमान्यतेच्या सुधारित आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील सुमारे ५२५ शिक्षकांची पदे कमी झाली आहेत. जुन्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यात गतवर्षी ७९५२ शिक्षक पदे मंजूर होती. सुधारित संचमान्यता आदेशानुसार यावर्षी ७४२७ पदे मंजूर झाल्याने ५२५ शिक्षक पदे कमी झाल्याचे स्पष्ट झाले.