esakal | कोल्हापुरात आज दिवसभरात 6 हजार 878 व्यक्तींना लसीकरण 

बोलून बातमी शोधा

6 thousand 878 persons were vaccinated in Kolhapur today

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोविशिल्ड लसीकरण मोहीम सुरू झाली आहे

कोल्हापुरात आज दिवसभरात 6 हजार 878 व्यक्तींना लसीकरण 
sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर - कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीकरणाला आज दुसऱ्या दिवशीही जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. 6 हजार 878 व्यक्तींना कोविशिल्ड लसीकरण करून घेतले. या पुढील काळात ज्या खासगी रूग्णालयांना शक्‍य आहे. त्यांनी दिवसातील 24 तास लसीकरण सेवा उपलब्ध करून देण्यास मंजूरी देण्यात येणार आहे. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोविशिल्ड लसीकरण मोहीम सुरू झाली आहे, यात कोरोनायोध्दा तसेच सुरक्षा यंत्रणेतील व्यक्ती तसेच ज्यांना 45 ते 60 वयोगटात ज्यांना व्याधी आहेत. अशा व्यक्तीनाही खबरदारीचा भाग म्हणून शासकीय व खासगी 16 रूग्णालयात कोविशिल्ड लसीकरण होत आहे. यात जिल्हाभरात 60 वर्षावरील 4 हजार 751 व्यक्ती तर 45 ते 60 वर्षातील व्याधिग्रस्तापैकी 947 व्यक्तीनीही लस घेतली आहे. 

शहरातील लसीकरण संख्या अशी  
एकूण लसीकरण 1387 
45 ते 60 व्याधीग्रस्त 118 
60 वर्षा वरील व्यक्ती व आरोग्य कर्मचारी 826 


  संपादन - धनाजी सुर्वे