सत्तर वर्षांपूर्वी कोल्हापुरात धावली होती ई-जीप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर

कोल्हापूर नेहमीच काळाच्या पुढं असणारं शहर आहे.

सत्तर वर्षांपूर्वी कोल्हापुरात धावली होती ई-जीप!

वाढत्या प्रदूषणावर पर्याय म्हणून ई-बाईक्स, ई-मोटार आता मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे; पण सत्तर वर्षांपूर्वी कोल्हापुरात ई-जीप तयार झाली होती आणि ती रस्त्यावर धावलीही होती... या साऱ्या आठवणींना आता पुन्हा उजाळा मिळू लागला आहे. येथील यशोधन जोशी यांना याबाबतचे एक जुने माहितीपत्रक उपलब्ध झाले असून, ‘आठवणीतले कोल्हापूर’ या फेसबुक पेजवर त्यांनी ते प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा: सोनिया गांधींना का भेटला नाहीत? ममता म्हणाल्या,'प्रत्येकवेळी दिल्लीला...'

कोल्हापूर नेहमीच काळाच्या पुढं असणारं शहर आहे. इथले तंत्रज्ञ आणि उद्योजक सतत प्रयोग करून नवनवीन शोध लावत असतात. भारतभर सध्या इलेक्ट्रिक वाहनांवर प्रयोग सुरू आहेत, पण कोल्हापुरात ७० वर्षांपूर्वी उद्योगमहर्षी वाय. पी. पोवार यांनी बॅटरीवर चालणारी जीप तयार केलेली होती. जर त्यावेळी त्यांना पुढील प्रयोगांसाठी आर्थिक पाठबळ मिळालं असतं तर एव्हाना कोल्हापूर ऑटोमोबाईल क्षेत्रात अग्रेसर झालं असतं. दख्खनची दौलत नावाचं एक औद्योगिक प्रदर्शन कोल्हापुरात १९५० मध्ये भरलेलं होतं. त्यावेळी वाय. पी. पोवार यांनी ६ व्होल्ट बॅटरीवर चालणारी जीप प्रदर्शित केलेली होती, अशी पोस्ट त्यांनी या पेजवर केली आहे आणि यानिमित्ताने या साऱ्या स्मृतींना उजाळा मिळू लागला आहे.

हेही वाचा: सरकारच्या घोषणेनंतरही राज्यभरात संप सुरुच; पडळकर काय म्हणाले?

यशोधक सांगतात, ‘‘१९५० मध्ये झालेल्या प्रदर्शनाचे माहितीपत्रक घरातील जुनी कागदपत्रे तपासताना मिळाले. वाय. पी. पोवार यांच्यावरील एका पुस्तकातही हे छायाचित्र बहुधा आहे, पण यानिमित्ताने सत्तर वर्षांपूर्वीचं वाहन क्षेत्रातील एक संशोधन नव्या पिढीसमोर आले आहे.’’

loading image
go to top