इचलकरंजी महापालिकेला तब्बल 72 लाखांचा दंड; 'या' कारणामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळानं धाडली नोटीस

प्रदूषण नियंत्रण मंडळाने इचलकरंजी महापालिकेला (Ichalkaranji Municipal Corporation) ७२ लाखांचा दंड केला आहे.
Ichalkaranji Municipal Corporation
Ichalkaranji Municipal Corporationesakal
Summary

महापालिकेच्या आरोग्य विभागाला (Health Department) नोटीस देऊन पंधरा दिवसांत ७२ लाखांचा दंड भरण्याचा आदेश देण्यात आला आहे.

इचलकरंजी : घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याच्या कारणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) इचलकरंजी महापालिकेला (Ichalkaranji Municipal Corporation) ७२ लाखांचा दंड केला आहे. या दंडाची नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाली आहे. दंडाची रक्कम न भरता नोटिशीला उत्तर देण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडून सुरू आहे.

शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने २०१७ मध्ये राष्ट्रीय हरित लवाद यांच्याकडे केली होती. त्यावर सुनावणी झाली होती, मात्र अंतिम सुनावणीच्या प्रक्रियेत तक्रारदारासह कोणीच हजर राहिले नाही. त्यामुळे लवादाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळास याबाबतचा आदेश देऊन महापालिकेवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले होते. प्रादेशिक अधिकारी जे.एस. साळुंखे यांनी याबाबत नोटीस दिली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाला (Health Department) नोटीस देऊन पंधरा दिवसांत ७२ लाखांचा दंड भरण्याचा आदेश देण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी हा आदेश देण्यात आल्याची माहिती आज समोर आली, मात्र अद्यापही महापालिकेकडून दंडाची रक्कम भरलेली नाही. उलट आमची बाजू ऐकून न घेता एकतर्फी दंडात्मक कारवाईची नोटीस काढण्यात आल्याचे कारण देत प्रशासनकडून याबाबत नोटिशीला उत्तर देण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे. एक-दोन दिवसांत याबाबतचे उत्तर दिले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com