
प्रवीण देसाई
कोल्हापूर : शहरातील नागरिकांसह पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेता महापालिकेने आणखी नवीन ७२ स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी चार कोटी ३७ हजार ६४४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सहा महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी स्थानिक नागरिकांचा याला विरोध होत आहे. त्यांची समजूत काढली जात आहे.