
कोल्हापूर : दहशतवादी संघटनेला पैसे पाठविल्याचे कारण सांगून सेवानिवृत्त अभियंत्याच्या खात्यातून ७ कोटी ८६ लाख रुपये सायबर चोरट्यांनी हडपले. ‘डिजिटल अरेस्ट’ गुन्ह्यातील ही रक्कम देशभरातील वेगवेगळ्या ५०० खात्यांवर वर्ग झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथील बॅंकांमधील खात्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली असून, २० लाखांची रक्कम गोठविण्यात यश आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.