भररस्त्यात 'राजाराम'च्या संचालकांवर जीवघेणा हल्ला; डॉ. नेजदारांसह आठ जणांना अटक, सर्वांना पाच दिवसांची कोठडी

कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आठ जणांना अटक केली.
Rajaram Sugar Factory Prakash Chitnis Attack
Rajaram Sugar Factory Prakash Chitnis Attackesakal
Summary

राजारामपुरी पोलिस ठाण्यात ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे आठपैकी चौघांना रात्रीच गांधीनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले.

कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे (Rajaram Sugar Factory) कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस (Prakash Chitnis) यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्लाप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी (Shahupuri Police) महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती डॉ. संदीप विलास नेजदार (वय ५०) यांच्यासह आठ जणांना अटक केली. त्या सर्वांना आठ जानेवारीपर्यंत कोठडी मिळाली आहे.

याप्रकरणी एकूण २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर (Police Inspector Ajay Sindkar) यांनी दिली. अन्य अटक केलेल्यांमध्ये बबलू ऊर्फ प्रसन्नकुमार विश्‍वासराव नेजदार (४०), तुषार तुकाराम नेजदार (३२), कौस्तुभ ऊर्फ पुष्कराज कमलाकर नेजदार (२५), दीप सुनील कोंडेकर (२३), पप्पू ऊर्फ प्रफुल्ल कमलाकर नेजदार (२३, सर्व रा. हनुमान गल्ली, कसबा बावडा).

Rajaram Sugar Factory Prakash Chitnis Attack
बदनामीचा कोणी प्रयत्न करत असेल, तर जशास तसे उत्तर देणार; अमल महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा

तसेच श्रीप्रसाद संजय वराळे (३०, आंबेडकरनगर), प्रवीण बाबूराव चौगले (३२, शिये, ता. करवीर) यांचा समावेश असल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. माजी नगरसेवक अजित विलास पोवार-धामोडकर, श्रीराम सोसायटीचे संचालक अनंत श्रीहरी पाटील, माजी सभापती धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण बाबूराव वराळे, युवराज बाबूराव उलपे आणि शिवाजी आंबी, महापालिका कर्मचारी निशिकांत कांबळे यांच्‍यासह अन्य दहा अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सात महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत श्री राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचा झालेला पराभवास कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस हेच कारणीभूत आहेत, असा समज करून आणि तो राग मनात धरून जीवे ठार मारण्याचा कट रचला. त्यातून मंगळवारी सायंकाळी चिटणीस यांची मोटार कसबाबावडा येथील पाटील गल्लीत अडवली.

Rajaram Sugar Factory Prakash Chitnis Attack
Satej Patil: सतेज पाटील-महाडिक वाद पुन्हा उफाळला! राजाराम साखर कारखान्याच्या संचालकाला बेदम मारहाण

त्यांना मोटारीतून बाहेर खेचून लाथाबुक्क्यांनी चेहऱ्यावर, हातावर, पोटावर, पाठीत, गळ्यावर, पायावर मारहाण केली. यावेळी चिटणीस यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन, रोख हजार रुपये असा सुमारे एक लाख एक हजार १० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिटणीस यांच्या मोटारीच्या दरवाजाचेही नुकसान केले आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. जखमी चिटणीस यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. त्यामुळे पोलिसांना जबाब घेण्यासाठी पहाटेचे तीन वाजले. त्यानंतर त्यांनी पहाटे चारच्या सुमारास गुन्हा नोंद केला. त्यानुसार मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवले होते. गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक अजय सिंदकर तपास करीत आहेत.

Rajaram Sugar Factory Prakash Chitnis Attack
'राजाराम'च्या संचालकाला बेदम मारहाण; पाटील-महाडिक वाद पोहोचला मुद्द्यावरून गुद्द्यावर, राजकीय परंपरेला गालबोट

दरम्यान, रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व आठही संशयितांना अटक केली. त्यांना राजारामपुरी पोलिस ठाण्यात ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे आठपैकी चौघांना रात्रीच गांधीनगर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले. तेथे त्‍यांना आठ जानेवारीपर्यंत कोठडी मिळाली. त्यानंतर सर्वांना राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.

घटना पाहणाऱ्यांचे जबाब नोंदविले

मारहाणीच्या ठिकाणाचा पंचनामा आज पोलिसांनी केला. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. घटना पाहणाऱ्यांचे जबाबही नोंदविण्याचे काम आज केल्याचे निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com