
शिवाजी यादव
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ असलेल्या गांधीनगर बाजारपेठेत कापड व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होते. या व्यवसायात मदतीसाठी जवळपास पाच हजारांवर असंघटित कामगारांना रोजगार मिळतो. मात्र, यातील ९० टक्के कामगारांची कामगार विभागाकडे यंदा सलग तिसऱ्या वर्षीही नोंदणी केली नसल्याने कामगारांना हक्काच्या योजनांचा लाभ मिळत नाही.