

Kolhapur crime news silver loot case
esakal
Kolhapur Police : आरामबसमधील चालक, वाहकाला कोयत्याचा धाक दाखवून ६० किलो चांदी, एक तोळा सोने लुटल्याचा प्रकार सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर घडला. बसमध्ये आधीपासूनच बसलेले तीन संशयित व दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या सात जणांनी हा दरोडा टाकला. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करत १२ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणी पोलिसांनी सातही संशयितांना अटक केली. आरामबसचा वाहकच या कटात सहभागी असल्याचे चौकशीत उघड झाले.