esakal | निशब्‍द...मुलीचा कोरोनानं मृत्यू आणि वडिलांनी सोडला जीव; आईपण पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

निशब्‍द...मुलीचा कोरोनानं मृत्यू आणि वडिलांनी सोडला जीव; आईपण पॉझिटिव्ह

मुली पाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने वृद्ध मातेलाही धक्का बसला आहे.

निशब्‍द...मुलीचा कोरोनानं मृत्यू आणि वडिलांनी सोडला जीव; आईपण पॉझिटिव्ह
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

कोल्हापूर : टाकाळा परिसरात मंगऴवारी एक धक्कादायक घटना घडली. कोरोनाने मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने पित्याचा मृत्यू झाला. मुली पाठोपाठ पतीचाही मृत्यू झाल्याने वृद्ध मातेलाही धक्का बसला आहे.

टाकाळा परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये कुटुंब राहते. घरातून कोणीच बाहेर येत नाही, अथवा हाक मारली तरी प्रतिसादही मिळत नसल्याने शेजाऱ्यांनी पोलिस आणि पालिकेशी संपर्क साधला. पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार निदर्शनास आला. मुलीच्या आईचा अहवालही पॉझिटिव्ह असल्याने त्यांना अलगीकरण कक्षात ठेवले आहे.

टाकाळा परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तरुण मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूचा जबर धक्का तिच्या माता-पित्यांना बसला. मुलीच्या मृत्यूनंतर सर्वांचीच टेस्ट झाली होती. यात वडिलांचा अहवाल निगेटिव्ह, तर आईचा अहवाल पॉझिटिव्ह होता. सकाळपासून त्यांच्या घरातून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने शेजारच्या नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिस आणि पालिकेशी संपर्क साधला असता हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शशिकांत भालकर यांनी पालिका आणि खासगी रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफच्या मदतीने मृतदेह अंत्यविधीसाठी पाठविला. भालकर यांनी महापालिकेच्या यंत्रणेला पाचारण करून औषध फवारणीही केली.