Kolhapur Crime News
esakal
कोल्हापूर
Kolhapur Crime News : घर पेटलं म्हणून शेजारचे बघायला गेले, तर रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
Kolhapur Suspicious Death : एक अज्ञात व्यक्ती घरात शिरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही वेळातच घरातून धूर येताना पाहून स्थानिकांनी तत्काळ धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.
Kolhapur Fire & Killed case : कोल्हापूर शहरातील हनुमान नगर, आयटीआय ते पाचगाव रस्त्यावर आज गुरूवार सकाळी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रिक्षा चालक मोहन सूर्यकांत पोवार (वय ६५) यांचा त्यांच्या राहत्या घरात खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की खून याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.