

Why Maharani Tarabai has no memorial at Panhala
esakal
Kolhapur Tarabai Bhonsale Legacy : छत्रपती राजाराम महाराजांच्या १७०० साली झालेल्या निधनानंतर संकटात सापडलेल्या मराठा साम्राज्याला उभारी देण्याचे ऐतिहासिक कार्य महाराणी ताराबाईंनी केले. अवघ्या २४ ते २५ व्या वर्षी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेत त्यांनी मोगल सम्राट औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले. सलग साडेसात वर्षे औरंगजेबासारख्या नृशंस, मुत्सद्दी व कपटी सम्राटाशी झुंज देत मराठेशाहीची पताका तेवत ठेवणाऱ्या या रणरागिनीच्या स्मृती पन्हाळा गडावर दुर्लक्षित का आहेत, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.