

Illegal Explosives
sakal
हातकणंगले: आळते (ता . हातकणंगले) गावच्या हद्दीत असलेल्या कारंडे मळ्यातील अमित पाटील यांच्या पडक्या बाथरूममध्ये १०५ डिटोनेटरच्या स्फोटकांचा साठा सापडला. याप्रकरणी पोलिसांनी गोपाललाल मांगीलाल जाट (वय ४०, रा. पिराप्पा पाटील मळा, मजले, ता. हातकणंगले) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.