esakal | आम आदमी पार्टी महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा लढविणार
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

आम आदमी पार्टी महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा लढविणार

sakal_logo
By
संदिप खांडेकर

कोल्हापूर : आम आदमी पार्टी (Aam Aadami Party) महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागा लढविणार असल्याची माहिती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्याच्या सत्तेत वाटा असलेले राज्यकर्ते कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील असूनही इथल्या प्रश्नांची सोडवणूक का होत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

श्री. राचुरे म्हणाले, "कोल्हापूरच्या जनतेला बदल हवा असल्याने त्यांच्यासाठी आम्ही माध्यम ठरणार आहोत. आपने दिल्लीत केलेल्या कामाची दखल नागरिकांकडून घेतली जात आहे. कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू राजांची कर्मभूमी आहे. येथे अडीच महिन्यांचा महापौर करून लोकशाहीचा अपमान करण्याचा प्रकार घडत आहे. त्याचा कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी आप महापालिकेत निवडणुकीत उतरणार आहे. भ्रष्टाचारी, गुन्हेगार जातीयवादी व चारित्र्यहनन झालेल्या कार्यकर्त्याला आपकडून उमेदवारी दिली जाणार नाही. प्रामाणिक कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू आहे."

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष

ते म्हणाले, "शहरातल्या नाल्यांवर झालेली बेकायदेशीर बांधकामे, अनधिकृत भराव, रेडझोनमधील बांधकामांमुळे पुराचे पाणी शहरात शिरत आहे. जयंती व गोमती नदीवरील पूररेषा स्पष्ट करून नव्या उपायोजना करण्याची आवश्यकता आहे. सरकारने पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम अद्याप दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने ऊसाला हेक्‍टरी एक लाख तर इतर पिकांना ५० हजार रुपये नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे." किशोर मंध्यान यांनी महाराष्ट्र जुने राज्य असून, सध्या कोसळलेल्या स्थितीत असल्याचा आरोप केला. विजय कुंभार यांनी कोल्हापूरच्या शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवले. पत्रकार परिषदेस धनंजय शिंदे, संदीप देसाई, निलेश रेडेकर, उत्तम पाटील उपस्थित होते.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी राजांना उतरावे लागते रस्त्यावर - ढोबळे

विकास कामांकरिता दिल्ली पॅटर्न....

महापालिकेच्या विकासकामांत १८ टक्के टक्केवारी घेतली जात असल्याचे व्हाट्सअप संभाषणातून समोर आले. त्यावर आपने हंडी फोड आंदोलन करून टक्केवारीचा निषेध केला. ही स्थिती लक्षात घेऊनच कोल्हापुरात विकासकामांसाठी दिल्ली पॅटर्न राबविणार असल्याचे राचुरे यांनी स्पष्ट केले.

मंदिरे उघडा म्हणणारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन कधी करणार असा, प्रश्न राचुरे यांनी उपस्थित करत महापालिकेत परवाना घेऊन टक्केवारी मागितली जात असल्याचा आरोप केला.

loading image
go to top