कर्जाचा बोजा कमी करून नव्या 7/12 साठी घेतली लाच; तलाठी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

दोनच दिवसांपूर्वी पालिकेत शाखा अभियंत्यासह दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले होते.

कर्जाचा बोजा कमी करून नव्या 7/12 साठी घेतली लाच; तलाठी अटकेत

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी : जमिनीच्या सात बारावर असलेला बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करून नविन सातबारा देण्यासाठी सात हजाराची लाच मागितल्याप्रकरणी आलास-बुबनाळचा तलाठी गजानन आप्पासो माळी (वय ४६, रा. शिवाजीनगर, इचलकरंजी) याला अटक केला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उप अधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी इचलकरंजी पालिकेत शाखा अभियंत्यासह दोघांना लाच घेताना रंगेहात पकडले होते.

हेही वाचा: जयंत पाटील यांच्या विरोधात पुन्हा एकदा 'सर्व'; आठजण रिंगणात

याबाबतची माहिती अशी, एक महिन्यापूर्वी तक्रारदार यांनी पाच एकर सात बाऱ्यावर नोंद केलेले जयसिंगपूर उदगाव बँकेचे कर्ज कमी करण्यासाठी योग्य कागदपत्रांसह आलास तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या मित्रास तलाठी माळी याला भेटण्यासाठी पाठवले. त्यावेळी माळी यांने दहा हजार लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकांने ३ नोव्हेंबर रोजी दोन पंचासमक्ष इचलकरंजीतील कॉंग्रेस भवनजवळ लाच मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये सात हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तलाठी माळी याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

हेही वाचा: मराठी भाषा विषय न शिकवल्यास आता होणार लाखांचा दंड

loading image
go to top