esakal | भीषण अपघातात वहिफणी व्यावसायिक जागीच ठार; इचलकरंजीतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

भीषण अपघातात व्यावसायिक जागीच ठार; इचलकरंजीतील घटना

भीषण अपघातात व्यावसायिक जागीच ठार; इचलकरंजीतील घटना

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : ट्रकच्या चाकाखाली सापडून एक वहिफणी व्यावसायिक जागीच ठार झाला. नवनाथ राजाराम पोवार (वय ३५, रा. पाण्याच्या टाकीजवळ, जवाहरनगर) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील डेक्कन चौकात अपघाताची ही घटना घडली. मृत मोपेडवरून इचलकरंजीकडे येत असताना ट्रकखाली सापडला. डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने पोवार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी शहापूर, शिवाजीनगर पोलिस तत्काळ हजर झाले. मुख्य मार्गावरच हा अपघात झाल्याने घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीसह मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

मृत नवनाथ पोवार हे वहिफणी व्यावसायिक आहेत. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जवाहरनगर येथून मोपेड वाहनावरून (क्र. एम. एच. ०९ ईडी ९१२७) कामानिमित्त इचलकरंजी शहरात येत होते. डेक्कन चौकात पुण्याहून इचलकरंजीला येणाऱ्या जयराम ट्रान्स्पोर्ट कंपनीच्या माल वाहतूक ट्रकखाली पोवार यांचे मोपेड वाहन सापडले. या अपघातात ते जमिनीवर कोसळल्यानंतर ट्रकचे चाक डोक्यावरून गेले. या अपघातात पोवार हे जागीच ठार झाले. मुख्य मार्गावर हा अपघात झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या.

हेही वाचा: शिक्षण मंडळात सावकारांचा अड्डा

घटनास्थळी शहापूर व शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. पोवार यांना उपचारासाठी आयजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी डेक्कन चौकातील वाहतूक कोंडी हटवून मार्ग वाहतूकीसाठी सुरळीत केला. पोलिसांनी ट्रकसह (क्र. एम. एच. १२ एनएक्स ४१६४) ट्रक चालक पांडुरंग साते (रा.सातारा) ताब्यात घेतले आहे. मृत पोवार यांच्या पश्‍चात आई, वडिल, भाऊ, दोन लहान मुले, पत्नी असा परिवार आहे.

loading image