कोल्हापूर ब्रेकिंग - वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट; तरुण जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

पेटलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवताला आग लागली.

कोल्हापूर - वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट; तरुण जागीच ठार

sakal_logo
By
रमेश पाटील

म्हाकवे : कागल-निढोरी वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. या स्फोटात कणेरी (ता. करवीर) येथील अभिजित हणमंत धनवडे (वय ३१) हा तरुण जागीच ठार झाला. सदरची घटना आज सकाळी घडली. जळत असलेली कार घाटात सुमारे २०० मीटर खोल दरीत जाऊन पडली. यात चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला आहे.

हेही वाचा: ST Strike | संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारचा 'मास्टरप्लॅन'?

घटनास्थळी कागल पोलिस स्टेशनचे निरीक्षक संजय गोर्ले दाखल झाले. अपघात झालेल्या ठिकाणी लोकांनी गर्दी केली आहे. पेटलेली गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवताला आग लागली. कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझवली. पोलिसांनी जळालेल्या गाडीचा शोध घेतला असता गाडी क्रमांक (एमएच ०९ एक्यू ३७०३) असून अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या मालकीची ही गाडी असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले. घटनेची माहिती गोरंबे माजी सरपंच शिवाजी पाटील यांनी कागल पोलिसांना दिली. पोलिस आणि अग्निशमन घटनास्थळी तात्काळ पोहचले. दरम्यान पोलिस सदर घटनेचा तपास करत आहेत असून घातपात की अपघात याबाबत घटनास्थळी लोकांत चर्चा सुरु होती.

हेही वाचा: भारतीय कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; लँसेंटचा रिपोर्ट

loading image
go to top