भावंडांचा 'तो' प्रवास ठरला अखेरचा; अपघातात बहिणीचा जागीच मृत्यू

गावकरी यात्रेच्या तयारीच्या कामात गुंतले असताना ममताच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली
 accident news
accident newssakal
Updated on
Summary

गावकरी यात्रेच्या तयारीच्या कामात गुंतले असताना ममताच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली

कोवाड - कोवाड-बेळगाव रस्त्यावरील कागणी (ता. चंदगड) शेजारी असलेल्या वळणावर मोपेड घसरून होसूर येथील बहीण-भावांचा अपघात झाला. अपघातात बहिणीचा मृत्यू झाला, तर भाऊ जखमी झाला. ममता सीताराम व्हडगे (वय २३) असे मृत बहिणीचे नाव असून, कोणेरी सीताराम व्हडगे (वय २१) हा जखमी झाला आहे. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास हा अपघात झाला. जखमीवर बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विठ्ठल नारायण व्हडगे यांनी पोलिसांत अपघाताची फिर्याद दिली. कोवाड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

 accident news
पंतप्रधानांविषयीचे वक्तव्य भोवले; पटोलें विरोधात गुन्हा दाखल

माहिती अशी, मृत ममता सध्या पुणे येथे नोकरीला होती. गावची लक्ष्मीची यात्रा असल्याने शनिवारी ती गावी आली होती. रविवारी दुपारी ती भाऊ कोणेरी व्हडगे याच्या मोपेडवरून (केए २२,ईएम, ४३७०) कोवाडला बाजारासाठी आली होती. गावी परत जाताना दुपारी सव्वातीनच्या सुमारास कागणीशेजारील रस्त्यावरील वळणावर गाडी घसरून अपघात झाला. यात ममताच्या डोक्याला जबर मार लागला, तर कोणेरी जखमी झाला. बेशुध्द ममताला बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला, तर जखमी कोणेरीवर उपचार सुरू आहेत. गावात लक्ष्मी यात्रेची धामधूम सुरू होती. दोन दिवसांवर यात्रा असल्याने सर्वच गावकरी यात्रेच्या तयारीच्या कामात गुंतले असताना ममताच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. अधिक तपास पोलिस नाईक किल्लेदार करीत आहेत.

 accident news
रशियाकडून युद्धाची तयारी; युक्रेनच्या सीमेवरील सॅटेलाइट फोटो आले समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com