टेम्पो खाली सापडून एक जण ठार ; कागल निढोरी मार्गावर कुरणीत अपघात

Accident in Kurani on Kagal Nidhori road one killed
Accident in Kurani on Kagal Nidhori road one killed
Updated on

मुरगूड (कोल्हापूर) : कागल - निढोरी मार्गावर कुरणी (ता.कागल) येथील हालसिद्धनाथ मंदिरा समोर आयशर टेम्पो खाली सापडून बांधकाम कामगाराचा दुर्दैवी अंत झाला.तुकाराम भिकाजी माने (वय 45,रा.कुरणी,ता. कागल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी,आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून आलेला आयशर टेम्पो क्रमांक (एम.एच.11 ए.एल.7059) हा निढोरीच्या दिशेने चालला होता.यावेळी कुरणीच्या हालसिध्दनाथ मंदिरासमोर बसस्थानकाजवळून कामावर चालत चाललेल्या तुकाराम भिकाजी माने (वय 45) यास या टेंम्पोंने जोराची धडक दिली.

ही घटना समजताच घटनास्थळी नागरिक जमा झाले.108 रुग्णवाहिकेस फोन करण्यात आला.पण मुरगूडची 108 रुग्णवाहिका बाहेर गेली होती.त्यामुळे गारगोटीहून रुग्णवाहिका आली.तत्पूर्वीच माने मयत झाले होते.त्यामुळे गाडी तशीच निघून गेली.मुरगूड पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला व मृतदेह मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.मानेच्या पश्चात पत्नी,मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Police System
Rajaram Puri Ganesh Procession
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com