esakal | कोल्हापूर शहरात 12 शाळाबाह्य मुले-मुली  शिक्षण समितीच्या सर्वेक्षणात मिळाली माहिती 

बोलून बातमी शोधा

null

हापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील 12 दिव्यांग मुले व मुली शाळाबाह्य आढळली आहेत. साखर कारखान्यांवर 46, तर वीटभट्टयांवर 22 मुले सापडली आहेत. स्थलांतरामुळे ती शाळेत जात नसल्याचे समोर आले. या मुला-मुलींना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरात 12 शाळाबाह्य मुले-मुली  शिक्षण समितीच्या सर्वेक्षणात मिळाली माहिती 

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर  : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील 12 दिव्यांग मुले व मुली शाळाबाह्य आढळली आहेत. साखर कारखान्यांवर 46, तर वीटभट्टयांवर 22 मुले सापडली आहेत. स्थलांतरामुळे ती शाळेत जात नसल्याचे समोर आले. या मुला-मुलींना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. 

शहरातील मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी समितीने 1 ते 10 मार्च दरम्यान सर्व्हे केला. प्राथमिक व खासगी शिक्षकांनी वॉर्डनिहाय मुला-मुलींची माहिती घेतली. शाळेत पाऊल न ठेवलेले 12 जण आढळून आले. यात आठ मुले व चार मुलींचा समावेश होता, त्यांना त्या त्या प्रभागातील शाळा शाळेत प्रवेश प्रवेशाची सोय केली आहे. ऊसतोड करण्याच्या निमित्ताने बीड, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर येथून ऊसतोड कामगार कुटुंबांसह जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या मुला-मुलींची नावे त्या त्या गावातल्या शाळांत नोंदवली गेली असली तरी कामाच्या निमित्ताने त्यांची शाळा बंद आहे.  या मुलांचा शोध घेतल्यानंतर 46 मुले-मुली अभ्यास न करता घरगुती कामे करताना दिसून आली. कसबा बावडा शुगरमिल येथील जीवन कल्याण प्राथमिक शाळेत त्यांची नावे नोंदवली. तावडे हॉटेलच्या परिसरात असलेल्या वीटभट्टयांवरही शाळाबाह्य मुला-मुलींचा शोध घेतला. त्यांची नावे जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयात नोंदवली गेली आहेत. 

शिक्षणापासून मुले-मुली वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू केले आहे. 12 मुले-मुली शाळाबाह्य आढळली आहेत. आयुक्त कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ, प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हे केला आहे. 
- रसूल पाटील, कार्यक्रम अधिकारी.