Kolhapur Crime
Kolhapur Crimeesakal

आईच्या मृतदेहाचे तुकडे करून खाणारा नशाबाज नराधम; दारूला पैसे दिले नाही म्हणून केला होता गळा दाबून खून

Kolhapur Crime : सुनील कुचकोरवी दारूच्या आहारी गेला होता. त्याच्या त्रासामुळे त्याची पत्नी चार मुलांसह माहेरी निघून गेली होती.
Published on
Summary

आईच्या (Mother) मृतदेहाचे तुकडे करून आरोपी सुनील कुचकोरवी खात असल्याचे आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शी पोलिसांचाही थरकाप उडला होता.

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : दारूला पैसे न दिल्याने सुनील रामा कुचकोरवी (वय ३५) याने आई यल्लाव्वा ऊर्फ गुणाबाई कुचकोरवी (वय ६३) यांचा गळा दाबून खून केला होता. आईला मारल्यानंतर तो खोलीतच बसून होता. या खोलीबाहेर आलेल्या रक्ताच्या थारोळ्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी (Kolhapur Police) घटनास्थळी येऊन आरोपीला पकडले असता एक विदारक चित्र समोर आले होते.

आईच्या (Mother) मृतदेहाचे तुकडे करून आरोपी सुनील कुचकोरवी खात असल्याचे आढळून आल्याने प्रत्यक्षदर्शी पोलिसांचाही थरकाप उडला होता. सुनील कुचकोरवी दारूच्या आहारी गेला होता. त्याच्या त्रासामुळे त्याची पत्नी चार मुलांसह माहेरी निघून गेली होती. पत्र्याच्या शेडमध्ये कुचकोरवी मायलेक राहत होते. आई यल्लव्वा त्याला काबाडकष्ट करून सांभाळण्यासह घरही चालवत होती.

Kolhapur Crime
भोस्ते घाटातील 'त्या' मृतदेहाचा उलगडा, पण स्वप्न सांगणारा योगेश आर्याच गायब, काय आहे प्रकरण?

घटनेच्या दिवशीही जेवणावरूनच आरोपी सुनीलने आईसोबत भांडण केले होते. जेवणाचे ताट भिरकावून त्याने थेट आईलाच संपविले. जन्माच्या आधीपासूनच मुलाच्या भविष्यासाठी आईची धडपड सुरू होते. मुलाचा जन्म, त्याचे संगोपन, शिक्षण, नोकरी, लग्न या टप्प्यांवर त्याचा सर्वांत जास्त विचार करणारी असते ती आई; पण व्यसनी सुनीलने आईचा निर्घृण खून करावा अन् तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते भाजून खावे, हा अत्यंत घृणास्पद प्रकार २८ ऑगस्ट २०१७ रोजी कावळा नाक्याजवळील वसाहतीत घडला होता.

Kolhapur Crime
शिक्षकाने पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून केला निर्घृण खून; डोक्यात वर्मी घाव, शिक्षिका रक्ताच्या थारोळ्यात पडल्या अन्...

जिल्हा न्यायालयात फाशी

शाहूपुरी पोलिसांनी या घटनेचा तपास करून २१ नोव्हेंबर २०१७ रोजी दोषारोपपत्र दाखल केले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये तपास अधिकारी संजय मोरे यांची साक्ष झाली. तर सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी ३४ साक्षीदार तपासले होते. कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने आठ जुलै २०२१ मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

उच्च न्यायालयात दाद

मरेपर्यंत फाशीची शिक्षा झालेल्या कुचकोरवीने मुंबई उच्च न्यायालयाकडे शिक्षा कमी करण्यासाठी दाद मागितली होती. हा गुन्हा दुर्मीळ आणि अतिशय गंभीर असून, कारागृहातील अन्य बंद्यांनाही धोका असल्याचे मत नोंदवत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी फाशीची शिक्षा कायम ठेवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com