Acharya Shri 108 Vardhman Sagar Ji Maharaj Sallekhana
esakal
जयसिंगपूर (कोल्हापूर) : कुंथलगिरी (जि. धाराशिव) येथे ७५ वर्षीय प. पू. आचार्य श्री १०८ वर्धमानसागरजी महाराज यांनी २३ जूनपासून 'यम सल्लेखना' व्रत स्वीकारले (Jain Acharya Vardhman Sagar Ji Samadhi) होते. त्यांचे रविवारी (ता.पाच) रात्री सल्लेखनापूर्वक समाधीमरण झाले. आचार्यश्रींना सर्वोच्च आणि अत्यंत कठोर धार्मिक व्रत करून सुमारे तेरा दिवसांनी समाधी मरण आले.