Kolhapur Police : अनधिकृत प्रार्थना स्थळावर महानगरपालिकेची धडक कारवाई; 250 पोलिसांचा बंदोबस्त तैनात

आज सकाळी कोल्हापूर महानगरपालिका फौजफाट्यासह कारवाई स्थळी पोहोचली आहे.
Kolhapur Police Municipal Corporation
Kolhapur Police Municipal Corporationesakal
Summary

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केला आहे.

कोल्हापूर : हिंदूत्ववादी संघटनेने लक्षतीर्थ वसाहतीतील अनधिकृत प्रार्थना स्थळांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेने (Kolhapur Municipal Corporation) आज कारवाईचा बडगा उगारलाय. आज सकाळी कोल्हापूर महानगरपालिका फौजफाट्यासह कारवाई स्थळी पोहोचली आहे.

यावेळी जवळपास २५० पोलिसांचा (Police) बंदोबस्त याठिकाणी तैनात आहे. एका समूहातील नागरिकांनी याला विरोध करत प्रार्थना स्थळाबाहेर ठिय्या मांडला आहे. दरम्यान, दुपारी दोन वाजेपर्यंत ही कारवाई थांबवण्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Kolhapur Police Municipal Corporation
Maratha Reservation : अधिसूचनेत कुणबींच्या सग्यासोयऱ्यांनाही दाखले; बावनकुळे म्हणाले, तो अंतिम मसुदा नाही..

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केला आहे. लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत प्रार्थना स्थळ आहेत, अशी तक्रार कोल्हापूर महापालिकेकडे प्राप्त झाली होती. दरम्यान, महिनाभरापूर्वीही पालिकेचे अधिकारी कारवाई करायला गेले असताना समन्वयातून मार्ग काढत संबंधित समाजाने अनधिकृत शेड उतरवले होते. परंतु, त्यांनी प्रार्थना स्थळावरुन न्यायालयात धाव घेतली होती.

Kolhapur Police Municipal Corporation
UNESCO : शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या 'प्रतापगड'ची वारसा स्थळासाठी शिफारस; 'या' 12 किल्ल्यांचाही समावेश

न्यायालयातून या कारवाईची स्थगिती उठल्यानंतर आज (बुधवार) पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथक यंत्रणेसह लक्षतीर्थ वसाहतीत कारवाईसाठी पोहोचले. या ठिकाणी कारवाई होऊ नये, यासाठी परिसरात मोठा जमाव जमा झाला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com