
Agricultural Service Centers Action : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी शेतकऱ्यांना अनुदानित खतांची विक्री करताना डिजिटल विक्री यंत्र (ई-पॉस प्रणाली) द्वारेच विक्री करणे बंधनकारक आहेत. तरीही त्याचे उल्लंघन करून खत विक्री करणाऱ्या १२ कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई करून परवाने निलंबित केले. यामध्ये कोल्हापूर शहरासह, शिरोळ, पन्हाळा, आजरा, भुदरगड तालुक्यातील केंद्रांचा समावेश आहे.