Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal Corporationesakal

Kolhapur Municipal Corporation : खोट्टं... खोट्टं बोलायचं नाय..., कुठून कोल्हापूर महापालिकेतून; घोटाळेबाज अधिकाऱ्यांसह ८ जणांवर कारवाई

Kolhapur Scam : कसबा बावड्यातील ड्रेनेज पाईपलाईनचे काम न करता बिल काढल्याच्या प्रकरणात जबाबदार प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आज महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी कारवाई केली.
Published on

Kolhapur Municipal Scam : कसबा बावड्यातील ड्रेनेज पाईपलाईनचे काम न करता बिल काढल्याच्या प्रकरणात जबाबदार प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आज महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी कारवाई केली. त्यात कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड, पवडी अकौंट विभागातील तत्कालीन सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, मुख्य लेखापरीक्षण कार्यालयातील वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे यांना निलंबित केले. मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण यांची शासनाकडून विभागीय चौकशी होईल. निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, तसेच कनिष्ठ लिपिक प्रभाकर नाईक यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com