इचलकरंजी : कुख्यात जर्मनी गँगवर पाचव्यांदा मोका अंतर्गत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

इचलकरंजी : कुख्यात जर्मनी गँगवर पाचव्यांदा मोका अंतर्गत कारवाई

इचलकरंजी : येथील कुख्यात "जर्मनी गँग"वर पाचव्यांदा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. टोळीप्रमुख आनंदा शेखर जाधव उर्फ जर्मनी, प्रविण उर्फ कन्नड पव्या मल्लाप्पा मगदुम, शुभम सदाशिव पट्टणकुडे, शिवा नारायण शिंगे, अमोल सुनिल लोले यांच्यावर कारवाई झाली. दोन महिन्यांपूर्वी स्क्रॅप व्यावसायिकाकडे गँगची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवून दहशत अबाधीत राखण्यासाठी व गँगच्या आर्थिक फायद्यासाठी १ लाख रुपयाची मागितली त्यांनी खंडणी मागितली होती.

हेही वाचा: बांगलादेश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; रात्रीत इंधन दरात 50 टक्क्यांची वाढ

या गुन्ह्याच्या तपासामध्ये सहभाग निष्पन्न झाला. त्यानंतर जर्मनी गँग या संघटित गुन्हेगारी संघटनेचा पुर्वेतिहास पाहता टोळीचा पुर्वाश्रमीचा प्रमुख व इतर साथीदारांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीसानी मोका कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांचेकडे सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करुन लोहिया यांनी मोका कारवाईस परवानगी दिली. गुन्ह्याचा पुढील तपास इचलकरंजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बी. बी. महामुनी यांचेकडे सोपविण्यात आलेला आहे.

Web Title: Action Under Moka Fifth Time Against The Germany Gang In Ichalkaranji

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..