
कोल्हापूर : लाच स्वीकारल्यावर तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यावर कारवाई होते; मात्र याचे धागेदोरे साखळी वरिष्ठ श्रेणीपर्यंत पोहचते का, यासंदर्भात सखोल तपास करून अशा मोठ्या माशांवरही कारवाईचे संकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगोंडा यांना दिले. दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ते दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नाडगोंडा म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारमुक्त देश होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर जनजागृती केली जात आहे. जनजागृती सप्ताहात शासकीय कार्यालयांसह खासगी व्यवसायांनाही सहभागी करून घेतले आहे. दोन ते तीन टक्के कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण विभाग बदनाम होतो. भ्रष्टाचार रोखणे हे काम केवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नसून प्रत्येक विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांचेही आहे. याबाबत प्रबोधन केले जात आहे.
तक्रारदारांच्या मनातील भीती दूर करून त्यांचे काम भविष्यात अडणार नाही. त्याची पूर्तता करण्यासाठी विभाग मदत करेल, असा विश्वास निर्माण करून भयमुक्त वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.’’ते म्हणाले, ‘‘लाचेच्या मागणीबाबत तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्या वेळी लाचेची रकमेचा हिस्सा आणखी कोणापर्यंत जातो, याचा शोध घेतला जाईल. अपहार, गैरव्यवहारासंबंधीच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधित संस्थेची चौकशीची परवानगी घेऊन पुढील कारवाई केली जाते. उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिकची मालमत्ता असणाऱ्यांवर कारवाईचेही काम करते. अशा संदर्भात परिक्षेत्रात ११ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.