esakal | नियतीनं केला घात; वडिलांच्या निधनाचं ओझं घेऊन आदित्यची परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

नियतीनं केला घात; वडिलांच्या निधनाचं ओझं घेऊन आदित्यची 'परीक्षा'

वडिलांच्या निधनाचे दुःख मनात ठेवून सोमवारी दहावीच्या परीक्षेला आदित्य सामोरे गेला.

नियतीनं केला घात; वडिलांच्या निधनाचं ओझं घेऊन आदित्यची 'परीक्षा'

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मिलिंद देसाई

बेळगाव : कोरोनाच्या Covid 19) संकट काळात जणू विद्यार्थ्यांची सत्वपरीक्षा सुरू आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू होण्यापासून अभ्यासक्रम, परीक्षा, निकाल याबाबत विद्यार्थ्यांची घालमेल वाढली आहे. त्यातच यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे दहावीची परीक्षा (10th-Examination) देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना काळात परीक्षेला सामोरे जावे लागत आहे‌. एकीकडे दहावी परीक्षा चिंता आणि दुसरीकडे नियमावलींचे पालन करत परीक्षा देण्याचे आवाहन दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर आहे. अशा विविध संकटांचे डोंगर असतानाच आपल्या वडिलांचे अपघाती निधन झाल्याची बातमी एका दहावीच्या विद्यार्थ्याला समजल्याने त्या विद्यार्थ्यांचे जणू अवसान गळाले. मात्र अशा परिस्थितीतून स्वतःला त्याने सावरले. आणि तो दहावीच्या परिक्षेला सामोरे गेला आहे.

(aditya-father-death-10th-examination-belgaum-update-karnataka-news-akb84)

अनगोळ येथील आदित्य सनदी या विद्यार्थ्यांच्या वडिलांचे रविवारी (ता.18 ) रात्री अपघाती 9.30 वाजता निधन झाले. तर सोमवार (ता. 19) पासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. यामुळे आदित्य हा द्विधा मनस्थितीत होता. तरीही त्याने दहावीच्या परीक्षेला प्राधान्य दिले. वडिलांच्या निधनाचे दुःख मनात ठेवून सोमवारी दहावीच्या परीक्षेला तो सामोरे गेला.आदित्यचे वडील अशोक मारुती सनदी वय 55 हे नावगे येथे अशोक आयर्न प्लॅन्ट 3 येथे नोकरी करीत होते. दररोजच्या प्रमाणे ते काम संवपुन घरी परत जात होते. रात्री 9.30 च्या सुमारास केएलई इंजीनियरिंग कॉलेज समोर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

हेही वाचा: गोव्यातील रेल्वेचे 5 मार्ग वळवले; वेळापत्रकावर होणार परिणाम

याबाबत उद्यमबाग पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दहावीच्या परीक्षेची तयारी करीत असलेल्या आदित्यला वडिलांचे निधन झाल्याची माहिती मिळताच धक्का बसला. मात्र त्याच्या कुटुंबाने व मित्र परिवाराने त्याला धीर दिला त्यानंतर वडिलांच्या निधनाचे ओझे घेऊनच तो टिळकवाडी येथीलवडिलांच्या निधनाचे ओझे घेऊनच परीक्षा केंद्रावर दाखल झाला तसेच पेपर संपल्यानंतर त्याच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

loading image