
कोल्हापूर : सरकारच्या भंगार धोरणानुसार महापालिकेच्या ताफ्यातील जुनी वाहने बंद करण्यात आली. त्यानंतर ज्या अधिकाऱ्यांची वाहने नाहीत त्यांच्यासाठी पूर्वी पदाधिकाऱ्यांची वाहने वापरली जाऊ लागली. त्यातीलही काही खराब होऊ लागली आहेत. काही महिन्यानंतर निवडणूक होऊन नवीन नगरसेवक सभागृहात येतील. त्यांच्यासाठी वाहनांची तजवीज करावी लागणार असल्याने पहिल्या टप्प्यात किमान दहा वाहनांची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी निधी खर्च करावा लागणार असल्याने आतापासूनच प्रशासनाने तयारी चालवली आहे.