esakal | अकरावी विज्ञानला जेमतेम प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

admissions

अकरावी विज्ञानला जेमतेम प्रवेश

sakal_logo
By
अवधूत पाटील -सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत केवळ ८३१ विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत. दहा महाविद्यालयांची एकूण प्रवेश क्षमता एक हजार ६२० इतकी आहे. त्याचा विचार केला तर क्षमतेच्या निम्मेच प्रवेश अर्ज आले आहेत. त्यामुळे अकरावी विज्ञान शाखेला यंदा जेमतेम प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: राजू शेट्टींची जलसमाधी परिक्रमेला सुरुवात; पाहा व्हिडिओ

शहरातील संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय, रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय, महाराणी राधाबाई (एमआर) कनिष्ठ महाविद्यालय, साधनाकनिष्ठ महाविद्यालय, गडहिग्लज कनिष्ठ महाविद्यालय, साई कनिष्ठ महाविद्यालय, क्रिएटीव्ह कनिष्ठ महाविद्यालय, मराठा कनिष्ठ महाविद्यालय, रचना कनिष्ठ महाविद्यालय, साधना महाविद्यालय (साधना माळ) या दहा महाविद्यालयातील विज्ञान शाखेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सहा अनुदानित तुकड्यात ५२० तर १० विनाअनुदानित तुकड्यात ११४० इतकी प्रवेश क्षमता आहे.

हेही वाचा: दत्त मंदिरात अभिषेक घालून शेट्टींची जलसमाधी परिक्रमेला सुरुवात

२५ सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली. ३० सप्टेंबरपर्यंत मुदत होती. पण, त्यामध्ये एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. या निर्धारित वेळेत ८३१ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले आहेत. क्षमतेचा विचार केला तर निम्मेच अर्ज आले आहेत. दरम्यान, उद्यापर्यंत (ता.२) अर्जांची छाननी केली जाणार आहे. ७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता निवड यादी प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलवर निवडीची माहिती कळविली जाईल. ७ व ८ सप्टेंबर या कालावधीत तक्रार निवारण केले जाणार आहे. तर ९ ते ११ सप्टेंबर या कालावधीत निवड यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

हेही वाचा: बाप्पाचे डोळे बोलके करणारी अस्सल कोल्हापुरी मनीषा!

आघाडीच्या महाविद्यालयातच चढाओढ...

अकरावी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी प्रवेशासाठी चढाओढ राहणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत पसंतीक्रमानुसार विद्यार्थ्यांना ज्या-त्या महाविद्यालयात प्रवेश दिले जातात. सहाजिकच विद्यार्थ्यांची आघाडीच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी पसंती असते. त्यामुळे या महाविद्यालयातच चढाओढ लागणार आहे.

गतवर्षीपेक्षा अर्ज कमी...

गतवर्षी अकरावी विज्ञान शाखेसाठी एक हजार ६२० इतकीच प्रवेश क्षमता होती. त्यासाठी एक हजार २२४ अर्ज आले होते. मात्र, यंदा प्रवेश क्षमता कायम असताना ८३१ इतकेच अर्ज आले आहेत. म्हणजे गतवर्षीपेक्षा तब्बल ३९३ अर्ज कमी आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अन्य शाखांसह पॉलिटेक्निकला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

loading image
go to top