esakal | बाप्पाचे डोळे बोलके करणारी अस्सल कोल्हापुरी मनीषा!
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

कोल्हापुरात लिखाई कारागिरांची संख्या अत्यल्प आहे. त्यांपैकीच एक मनीषा पंदारे.

बाप्पाचे डोळे बोलके करणारी अस्सल कोल्हापुरी मनीषा!

sakal_logo
By
स्नेहल कदम

कसबा बावडा (कोल्हापूर) : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत उत्तमोत्तम मूर्ती दाखल झाल्या आहेत. चोखंदळ ग्राहक मूर्ती निवडताना गणेशाची बैठक व्यवस्था, रंगसंगती, सुबकपणा यांसह सर्वाधिक प्राधान्य देतो, ते मूर्तीस जिवंत करणाऱ्या डोळ्यांच्या कलाकारीला. असे अतिशय सुबक, देखणे डोळे साधण्याची कला फार कमी कलाकारांना अवगत आहे. त्यामध्ये येथील बापट कॅम्पमधील मनीषा पंदारे यांचा समावेश आहे. मनीषा यांनी डोळे रंगवलेल्यांना मूर्तींना बाजारात खूप मागणी आहे.

भक्तांना डोळ्यांत जिवंतपणा असणारी मूर्ती हवी असते. ती कलाकारी लिखाई कारागिरांकडे प्रामुख्याने असते. कोल्हापुरात लिखाई कारागिरांची संख्या अत्यल्प आहे. त्यांपैकीच एक मनीषा पंदारे. पेंटिंगची आवड असल्याने त्या या क्षेत्राकडे वळल्या. यासाठी त्यांना मूर्तिकार कुंभार बंधूंनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा: दत्त मंदिरात अभिषेक घालून शेट्टींची जलसमाधी परिक्रमेला सुरुवात

मनीषा म्हणतात की, लिखाई कलाकारीचे काम जिकिरीचे आहे. सुरुवातीला अनेक मूर्तींवर प्रयोग केले. त्यातील चुकांतून मी सुधारत गेले. आज मी छानपणे मूर्तीचे डोळे रंगवू शकते. त्यामुळे माझ्या कलाकारीस मागणी खूप आहे. या कामासाठी सुरुवातीला वॉटरकलरचा वापर होत होता; मात्र कालांतराने यामध्ये ॲक्रॅलिक कलरचा वापर वाढला. मूर्तीवर पाणी पडले तर डोळ्यांचा रंग जाऊन आकारात बदल व्हायचा. यासाठी अॅक्रॅलिक कलरचा वापर सुरू झाला. पूर्ण मूर्तीचे रंगकाम संपले की, लिखाईचे काम सुरू होते.

पंधरा वर्षे मी हे काम करत आहे. बापट कॅम्प परिसरात मी एकमेव लिखाईचे काम करणारी आहे. पेंटिंगची आवड असल्याने मी या क्षेत्राकडे वळले. आता माझी ही आवड आणि माझे करिअर अशा दोन्हींची सांगड झाली आहे. मला यात आणखी मास्टर व्हायचे आहे.

- मनीषा पंदारे, लिखाई कलाकार

loading image
go to top