
संतोष मिठारी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात राबवित असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत सध्या विद्यार्थ्यांपेक्षा ‘त्रुटींचा’ जास्त प्रवेश झाला आहे. प्रवेशाबाबतची ऑनलाईन प्रक्रिया योग्यरीतीने समजली नसल्याने विद्यार्थ्यांच्या पातळीवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत कसेबसे १००७ जणांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या त्रुटी दूर झाल्या नाहीत, तर विद्यापीठ कॅम्पसमधील निम्म्या जागा रिक्त राहण्याचा धोका आहे.