
कोल्हापूर : मंगल कार्यालयांसाठी भरलेली अनामत रक्कम (ऍडव्हान्स) परत न देण्याचा निर्णय मंगल कार्यालय संघटनेने घेतला आहे. ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना लग्नाची तारीख बदलून दिली जाईल, मात्र अनामत रक्कम परत मिळणार नाही.
कोरोनाच्या प्रादुर्भावा नंतर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लग्नसराईत विस्कळीत झाली आहे. जानेवारी ते जून असा हा हंगाम असतो. फेब्रुवारीपर्यंत विवाहाचे बार धडाक्यात उडाले. पंधरा मार्चनंतर कोरानोची चर्चा झाली. 22 मार्चला जनता कर्फ्यु जाहीर झाला. नंतर 23 पासून राज्य लॉकडाऊन झाले. मंगल कार्यालय दिसायला भव्य असले तरी बॅंकांचे हप्ते, कामगारांचा पगार, देखभाल दुरूस्ती याचा खर्च अधिक आहे. बॅन्डवाले, आचारी, सजावट यावर पॅकेजवर कार्यालयांची अनामत रक्कम अवंलबून असते.
शहरात नोंदणीकृत सुमारे शंभर मंगल कार्यालये आहेत. विजेचे तसेच पाण्याचे बिल व्यापारी वापराच्या दराने येते. वर्षातील 365 दिवसापैकी साठ ते सत्तर दिवस कार्यालयांचे बुकींग असते. उर्वरीत काळात हा कार्यालयांची देखभाल दुरूस्ती, पगारावरच खर्च करावा लागतो.
लॉकडाऊनच्या काळात प्रारंभी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कौटुबिंक कार्यक्रमांना परवानगी दिली गेली. नंतर त्यावर बंदी घातली गेली. ज्यांनी मंगल कार्यालयांकडे अनामत रक्कम भरली होती त्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. लग्नाचा मुहुर्त विस्कळीत झाला असताना पैसे कशासाठी भरायचे असा प्रश्न पडला. लॉकडाऊनची सद्यस्थिती पाहता जूनपर्यंत संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होतो अशी खूणगाठ पक्की झाल्याने लग्न समारंभ आयोजित केला तरी लोक मोठ्या संख्येने येतील की नाही याची चिंता लागून राहिला आहे. आता तुळशी विवाहानंतरच लग्नाला मुहुर्त मिळण्याची शक्यता आहेत.
मंगल कार्यालयांचे अर्धे वर्ष वाया गेले आहे. जाऊळ, बारसे, ओटीभरणी यासारख्या कौटुबिंक कार्यक्रमांची अनामत रक्कम परत दिली जाईल. मात्र, लग्नासाठी मंगल कार्यालये बुकींग झाले असताना त्याची मात्र रक्कम परत मिळणार नाही.
-----
मंगल कार्यालयांचे दिसताना व्याप मोठा दिसतो, प्रत्यक्ष लॉकडाऊनमुळे व्यवसायाची मोठे नुकसान झाले आहे. बॅंकाचे हप्ते, देखभाल दुरूस्तीचा खर्च लाखाच्या घरात असतो. यावर्षी विवाहासाठी ज्यांना नोदणी केली आहे त्यांची अनामत रक्कम परत मिळणार नाही. त्यांना तारीख बदलून निश्चित देऊ.
- सागर चव्हाण, अध्यक्ष, मंगल कार्यालय संघटना.
विवाह सोहळ्याबाबत
आज निर्णय शक्य
कोल्हापूर : राज्य शासन घरगुती पद्धतीने लग्न समारंभास परवानगी दिली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातही घरगुती पद्धतीने लग्न समारंभ करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. ज्या-त्या तालुक्यातील तहसिलदार यांनी प्रत्यक्ष भेटून व अर्ज देवून लग्न समारंभ करण्याची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लग्न समारंभाला अजून अधिकृत परवानगी दिलेली नाही. दरम्यान, याबाबत उद्या (शुक्रवार) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांनी लग्नसमारंभ स्थगित केले आहेत. दरम्यान, नव्याने 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढल्यामुळे ज्यांनी-ज्यांनी 5 ते 17 मे दरम्यान ज्यांनी लग्न समारंभाचे नियोजन केले आहे. त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे लग्नासाठी परवानगी मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.